पुणे – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून व हर घर तिरंगा अभियानाचा संदेश प्रसार करण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्टच्या पुणे विभागीय कार्यालयाने तिरंगा ध्वजासह दुचाकी मिरवणुकीचे आयोजन केले होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार, पुणे शहर विभागीय कार्यालयाचे विभाग प्रमुख राजेश सिंग, उप विभागीय प्रबंधक प्रसांत दाश, अमित श्रीवास्तव मुख्य दक्षता अधिकारी, यावेळी उपस्थित होते.