पुणे – सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर व बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यातील दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लिमिटेड व विश्वेश्वर बॅंक सेवक संघ, पुणे यांच्यामध्ये सेवक वेतन करार झाला आहे. कराराचा कालावधी 1 जुलै 2022 ते 30 जून 2025 असा तीन वर्षांचा आहे. करारामुळे सेवकांना श्रेणीनुसार किमान रुपये 1,100 ते कमाल रुपये 13,000 इतकी मासिक वेतनवाढ मिळणार असून सवलतीच्या दराने कर्ज व रजा आदी सुविधा देखील मिळणार आहेत.
सदर करारावर बॅंकेच्या वतीने अनिल गाडवे (अध्यक्ष), सीए मनोज साखरे (उपाध्यक्ष) संचालक सुनील रुकारी, अमोल मणियार, राजेंद्र मिरजे, अतुल रुकारी, ऍड पुरुषोत्तम लांडगे, श्रीराम आपटे (मुख्य कार्यकारी अधिकारी) व राम दराडे (सरव्यवस्थापक) यांनी तर सेवक संघटनेच्या वतीने सोमनाथ वाडेकर (अध्यक्ष), बापूसाहेब गिरमे (सरचिटणीस), अमित सोळसे, ओमकार वीरकर व कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बॅंकेतील 336 कर्मचाऱ्यांना सदर कराराचा लाभ मिळणार आहे.