पुणे – दिवंगत अक्षय शेखर पवार यांच्या स्मरणार्थ गुरूवार पेठेतील सर्व मित्र परिवाराने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे हे ३ रे वर्ष आहे. प्रेम दिवसाचे औचित्य साधून एका मित्राने दुसऱ्या मित्राला श्रध्दांजली वाहीली आहे. शार्दुल मित्र मंडळ, MEET YOUR MAKERS GROUP आणि अक्षय पवार मित्र परिवार यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
श्रीराम बांगड यांची रक्ताचे नाते ट्रस्ट आणि रास्ता पेठेतील P.S.I रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, समाज सेवक नितीन ढमाले, राष्ट्रवादी कॅांग्रेसचे जेष्ठ नेते सुनिल खाटपे, विजय ढेरे, कॅांग्रेस नेते संजय बालगुडे, मनसे शहर शहर अध्यक्ष प्रशांत कनोजिया, रवि सहाणे. समाजसेवक डॅां गणेश परदेशी, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्तदानाच्या जवळ 120 पिशव्यांचे संकलन झाले.