करोना योद्ध्यांवर भंडाऱ्याची उधळण

जेजुरी -ससून रुग्णालयात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या जेजुरी येथील करोना योद्धा डॉ. प्रशांत सुभाष दरेकर यांचे जेजुरीत आगमन होताच मार्तंड देवसंस्थान, सुवर्ण स्टार सोशल क्‍लब, मेडिकल असोसिएशन संभाजी ब्रिगेड, श्रीराम मित्र मंडळ, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई व नागरिकांनी भंडाऱ्याची उधळण करीत पुष्पवृष्टी केली.

श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्‍वस्त प्रमुख संदीप जगताप, ट्रस्टी पंकज निकुडे, शिवराज झगडे, जेजुरी मेडिकल असोसिएशनचे डॉ. नितीन केंजळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लोकेश सावंत, गणेश आगलावे, कृष्णा कुदळे, माउली खोमणे यांनी सदानंदाचा येळकोट, असा जागर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.