एकनाथ खडसे यांचा भाजपला निर्वाणीचा शेवटचा इशारा
जळगाव : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजपमधील घरभेद्यांवर तत्काळ कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आता खडसेंच्या अल्टिमेटनंतर भाजप हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा देतानाच आपल्याला इतर तिन्ही प्रमुख पक्षांकडून निमंत्रण आल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान मागील मोठ्या कालावधीपासून एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. वेळोवेळी त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, थेट पक्षाला इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणातच खडसेंनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही, पण माझा भरोसा नसल्याचे म्हणत पक्षाला योग्य संदेश दिला होता.