‘इश्क में मरूंगा भी और मारूंगा भी’..मरजावा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या मरजावां चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत फक्त या चित्रपटाचे वेगवेगळे पोस्टर समोर आले आहेत. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी गुरूवारी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे.

मिलान मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री तारा सुतारिया आणि राकुल प्रीत सिंग या दोघींची महत्वाची भूमिका पहायला मिळणार आहे. यापुर्वी देखील काही चित्रपटांमध्ये सिद्धार्थचा ‘अँग्री यंगमॅन’ लूक बघायला मिळला आहे. सिद्धार्थ आणि तारा सुतारियाची लव्हस्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, तर अभिनेता रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, भरमसाठ डायलॉग असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर मात्र सस्पेन्सने संपत असल्याने या चित्रपटाची असणारी उत्सुकता चाहत्यांमध्ये आणखी वाढली आहे. मरजावां हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.