Ritesh Deshmukh| अभिनेता रितेश देशमुखने गुढीपाडवा हा सण आपल्या मुलांसह साजरा केला आहे. अभिनेत्री जिनिलीया देशमुखने पती रितेशचा मुलांसोबत गुढीला सजवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलीया देशमुखने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख आपल्या लाडक्या मुलांबरोबर रिआन व राहिलासह गुढीला सजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने लिहिलं आहे, “पहाटे आमची गुढी तयार होतं आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.”
यासोबतच तिने रितेशबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिनं पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तिनं लिहलं, ‘गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा …तुमच्या कुटुंबाला आनंद आणि समृद्धी लाभो’. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. विविध व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांचे मनोरंजन करतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची रितेशने घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे. तर निर्मितीची धुरा जिनिलीया सांभाळणार आहे. २०२५ला ‘राजा शिवाजी’ चित्रपट मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
बिग बॉस OTT 3 मध्ये सना खानची एंट्री