सान्या मल्होत्राच्या “पगलैट’ या आगामी सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या “पगलैट’ची कथा एकदम वेगळी आहे. सिनेमात तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. पण तिला त्याचे अजिबात दुःख झालेले नाही. याचे तिच्या कुटुंबीयांना खूप आश्चर्य वाटत असते. नवऱ्याच्या निधनानंतर तिने केवळ
View this post on Instagram
स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण तिच्या समोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या असतात. परिवार आणि समाजाची भूमिका तिच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध असते.
View this post on Instagram
मात्र, तरीही सान्या आपल्या मनाप्रमाणे जगत असते. अशी नायिका सान्याला “पगलैट’मध्ये साकारायची आहे. ही कथा वैयक्तिक अनुभवातून सुचल्याचे निर्माता, दिग्दर्शक उमेश भट यांनी सांगितले. “पगलैट’ 26 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सान्याला आतापर्यंत मिळालेल्या रोलमध्ये “पगलैट’चा रोल एकदम हटके आहे.
View this post on Instagram
“पगलैट’मध्ये सान्या मल्होत्राच्या व्यतिरिक्त सयानी गुप्ता, श्रुती शर्मा, आशुतोष राणा, रघुबीर यादव, शीबा चा, मेघा मलकी आणि राजेश तैलंग आदी कलाकार मंडळी आहेत. यापूर्वी अनुराग बासूच्या “ल्युडो’मध्ये सान्या दिसली होती. यानंतर विक्रांत मेसी आणि बॉबी देओलबरोबर “लव हॉस्टेल’मध्ये ती असणार आहे.