भोसेत दरड घसरून वाहतूक ठप्प

पाचगणी – भोसे, ता. महाबळेश्‍वर येथील गावाकडील जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी 8 च्या दरम्यान दरड रस्त्यावर आली. या दरडीमुळे गावात व गावच्या बाहेर जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सध्या महाबळेश्‍वर तालुक्‍यात भरपूर पाऊस पडतो आहे. या पावसामुळे तालुक्‍यात काही ठिकाणी घराच्या भिंती, कुठे दरडी कोसळत आहेत. आज भोसे अशीच एक दरड गावात घडली.

सकाळी दरड कोसळल्याने शाळेत जाणारी मुले, कामगार खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच भोसे गावचे सरपंच विकास गोळे, पोलीस पाटील रुपाली गोळे, ग्रामसेवक प्रमोद पोळ, गुलाब गोळे, मोहन गोळे, तुषार गोळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन मशिनरीच्या सहाय्याने ही दरड हटवण्यात आली. याबाबतची माहिती तहसीलदार मीनल कळसकर, तलाठी वणवे यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.