उदयनराजेंनी आधीच जायला हवं होतं

शिवेंद्रसिंहराजेंची टिप्पणी; त्यांचे नि आमचे प्रेम माहितीच!

सातारा  – खासदार उदयनराजेंचे मित्र मुख्यमंत्री आहेत. ते त्यांच्या वाढदिवसालाही आले होते. मग तेव्हाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, अशी टिपणी माजी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली.

सातारची नगरपालिका थोरल्यांकडे आहे, त्यांचे आणि आमचे किती प्रेम आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, अशा शब्दांत शहरातील विकास कामे करताना होत असलेल्या राजकीय तिढ्यांबाबत अगतिकताही त्यांनी व्यक्त केली.
शाहूपुरी येथील हास्य क्‍लब तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे बा. ग.जोशी, ब्राह्मण महासंघाचे धनंजय कुलकर्णी, निरामय ज्येष्ठ नागरिक संघाचे शंतनू कुलकर्णी, विवेकानंद केंद्राचे अनिल गोहाड, तसेच शाहूपुरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व शाहूपुरीतील नागरिक उपस्थित होते. शाहूपुरीतील अनेक समस्यांचा उहापोह या बैठकीत करण्यात आला. यावेळी कमळपुष्प देऊन शिवेंद्रसिंह यांचे स्वागत करण्यात आले. रखडलेला कोटेश्‍वर पूल, शाहूपुरीतील निकृष्ट रस्ते, बंदिस्त गटारे, पाणीपुरवठा याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी भोसले यांच्या कानावर घातल्या.

मी आमदार म्हणून प्रयत्न करत असलो तरी शाहूपुरी ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेत आपल्या विचारांची सत्ता नसल्याने विकास कामे करण्यात अडथळा येत असल्याचे शिवेंद्रसिंह यांनी सांगितले. विशेषतः रस्त्याच्या दूरवस्थेवरून नागरिक आक्रमक झाले होते. रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असून ठेकेदारांवर अंकुश नाही, कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

सीओंच्या सहीचे अधिकार जलमंदिरवर
शहरातील विकास कामांबाबत भोसले म्हणाले, “आमचे केवळ 12 नगरसेवक असून त्यांनी सुचविलेली कामे अडवली जातात. राजकीय तिढ्यांमुळे काम करणे अवघड होऊन बसले आहे. जलमंदिरमधून फोन आल्याशिवाय सीओंना सह्या करण्याचा अधिकार आहे का, याचीही माहिती घ्या, असे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या कारभारावर न बोललेलेच बरे, असे नमूद करत त्यांनी पालिकेवरही टीका केली. नगराध्यक्ष कदम बाईंना एखादे काम सांगितले तर मला नुसतेच “हो’ म्हणतात. पण, करत काही नाहीत. कोटेश्‍वर पुलाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले आहे, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या वॉर्डातील ते काम असून ते चौकात फक्त हाताची घडी घालून उभे असतात, त्यांना काम का रखडले आहे, याचा जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)