नवी दिल्ली – भारताची अव्वल स्क्वॅशपटू जोश्ना चिनाप्पा हिला जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. इजिप्तची जागतिक अग्रमानांकित रनीम एल्वेली हिने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने जोश्नाला टॉप-10 मध्ये स्थान आपला समावेश होण्याची लॉटरी लागली आहे.
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे जोश्नाच्या क्रमवारीतील स्थानातही घसरण झाली होती. 2016 साली भारताची अव्वल खेळाडू दीपिका पल्लीकलने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले होते, त्यानंतर आता जोश्नाला हा मान मिळाला आहे. पुरुष क्रमवारीत भारताचा अव्वल खेळाडू सौरव घोषाल 13 व्या स्थानावर आहे.