सिप्लाचे करोनावरील औषध स्वस्त

मुंबई  -सिप्ला या औषधी कंपनीने रेमडेसिवीर हे करोनावरील औषध भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले आहे. हे औषध मूळ अमेरिकन कंपनीच्या परवानगीने सिप्लाने रेमडेसिवीर औषध तयार केले आहे. मात्र, सिप्ला कंपनीचे जेनेरिक औषध इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे.

सिप्ला कंपनीने सांगितले की, 100 मिलीग्रॅम औषधाला 4 हजार रुपयाचा दर आकारण्यात आला आहे. इतर कंपन्यांच्या या औषधाचा दर 5 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतात या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आगामी काळामध्ये सिप्ला कंपनी औषधाचे उत्पादन वाढवणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.