पुणे – विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मीडिया, टी. व्ही. चॅनेल, रेडीओ, केबल्सद्वारे देण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम असून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, मोहन राठोड हे नोडल अधिकारी आहेत.