Rahul Kaswan | Rajasthan – राजस्थानात पक्षाच्या विद्यमान खासदाराने राजीनामा देऊन कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्याने सत्तारूढ भाजपला मोठाच धक्का बसला आहे. राहुल कासवान असे या खासदाराचे नाव असून ते आज मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये सामिल झाले.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने त्यांना चुरू मतदार संघातून उमेदवारी नाकारली होती. भाजपने चुरू मतदारसंघातून देवेंद्र झझारिया यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.
परंतु तिसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या या निर्णयावर टीका केली. आपण प्रामाणिकपणे काम करून सुद्धा भाजपने आपल्याला वाऱ्यावर सोडले असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा हेही उपस्थित होते. । Rahul Kaswan | Rajasthan