मेष : ग्रहांची साथ मिळेल. आर्थिक सुधारणा होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम राहाल.
वृषभ : तुमची एखादी कल्पना परवडली/ पटली नाही तरीही त्याच कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल.
मिथुन : नोकरीत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील. कामात शॉर्टकट घेऊन काम संपवाल.
कर्क : कामानिमित्ताने ओळखी होतील. प्रवास होईल. घरात इतरांशी मिळतेजुळते घ्या नाहीतर खटके उडतील.
सिंह : कलावंत, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात नवीन काहीतरी करावेसे वाटेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल.
कन्या : महिलांना पदार्थांचे नवनवीन प्रयोग करावेसे वाटतील. तरुणांना-साहस, धाडस करावसे वाटेल.
तूळ : पैशाची चिंता मिटेल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब कराल.
वृश्चिक : कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलेल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने पैशाची नड भागेल.
धनू : नोकरीत महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर असेल. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. अधिकारही प्राप्त होईल.
मकर : घरात अत्यावश्यक खरेदी होईल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. महिलांचा वेळ मजेत जाईल.
कुंभ : मानसिक समाधान मिळेल. तरुणांनी मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. उत्साही राहाल.
मीन : खेळत्या भांडवलाची सोयही होईल. मित्रसंगतीमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.