मेष : कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्वास बाळगू नये. नोकरीत कामाचा आनंद मिळेल.
वृषभ : महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. जुनी येणी वसुल होतील.
मिथुन : नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील.
कर्क : महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. नवीन कामे मिळतील.
सिंह : व्यवसायात हातातील कामांना विलंब होण्याची शक्यता. तरी नाराज होऊ नका. नोकरीत संधी चालून येतील.
कन्या : प्रवासयोग जोडधंदयातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळेल.
तूळ : स्वास्थ्याबाबत मात्र थोडे अधिक दक्ष रहावे लागेल. ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल.
वृश्चिक : एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय व भागीदारीतून विशेष लाभ होईल.
धनू : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. उत्तम बदल होतील.
मकर : मानसन्मान मिळेल. यशप्राप्तीने मानसिक समाधान मिळेल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कुंभ :नोकरदार महिलांनी वादविवाद वाढू देऊ नयेत. तरूणांना विवाहयोग येतील. नवपरिणीतांना भाग्योदय.
मीन : व्यवसायात अडथळे आले तरी कामाचा वेग कमी करू नका. खरेदीतून लाभ होतील. पैशाची चिंता मिटेल.