आजचे भविष्य (शुक्रवार, 5 मार्च 2021)

मेष : व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कामात बदल करावा लागेल. छंद जोपासता येईल.

वृषभ : पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. त्यातून नवीन गुंतवणूकीचे विचार मनात येतील.

मिथुन : विरोधकांचा विरोध मावळेल ते तुमच्या कलात उचलून धरतील. कामानिमित्ताने हितसंबंध जोडले जातील.

कर्क : आनंदाचा सोहळा साजरा कराल. योग्य वेळी योग्य व्यक्तिंचे मिळालेले सहकार्य तुमचा ताण कमी करेल.

सिंह : अस्थिरताही कमी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. देणी देता आल्याने जमा खर्च सारखाच राहील.

कन्या : त्या स्विकारताना स्वतःची आर्थिक व शारिरीक कुवत ओळखून मगच पुढे जा. पैशाचे व्यवहारात चोख रहा.

तूळ : व्यवसायात आर्थिक आवक फार नसली तरी केलेल्या कामाचे समाधान मिळेल. प्रवासाचे योग येतील.

वृश्‍चिक : व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील. महिलांना स्वास्थ्य लाभेल.

धनु : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील.

मकर : व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करुन उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील.

कुंभ : कधी शक्ती तर कधी युक्तीने कामे हातावेगळी कराल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील.

मीन : व्यवसायात तुमच्या मताला मान मिळेल. त्यामुळे प्रगतीचा वेग राखता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.