नवी दिल्ली : तिंरगी ज्युनियर महिला हाॅकी स्पर्धेमध्ये बुधवारी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला ‘२-०’ ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा दुसरा सामना गुरूवारी आॅस्ट्रेलियाशी होणार आहे.
पहिल्या सामन्यात लालरिंडिकी आणि प्रभालीन कौरने प्रत्येकी १ गोल करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळे आज होणा-या बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरूध्द सरस कामगिरी करण्याचे दडपण त्याच्यावर असणार आहे.
After a thrilling NZLvIND game today, get ready yet again to watch our eves compete tomorrow.#IndiaKaGame@IndiaSports @CMO_Odisha @sports_odisha @Media_SAI pic.twitter.com/BoDYG8sFXJ
— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2019
दरम्यान, स्पर्धेत आतापर्यत न्यूझीलंड आणि भारतीय संघाने प्रत्येकी १ विजय मिळवले आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाचा ३-१ असा तर बुधवारी भारतीय संघाने न्यूझीलंडचा २-० ने पराभव केला आहे. आॅस्ट्रेलियाला मात्र एकही सामना जिंकता आलेला नाही.