टिकटॉकचा युझर्सला दणका; ‘ते’ 60 लाख व्हिडीओ डिलीट

मुंबई- सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या मोबाईल व्हिडीओ अॅप्लिकेशन तरुण-तरुणींना अगदी झपाटून टाकले आहे. मात्र 60 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, टिकटॉकवरील काही युजर्स जास्तीतजास्त लाईक्‍स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात अश्‍लीलता, धार्मिक तेढ, आक्षेपार्ह वर्तन आणि वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले जात होते. हे व्हिडिओ भारतातील मार्गदर्शक तत्त्वांचे(कंटेंट गाइडलाइन) उल्लंघन करणारे होते. टिकटॉकवर बेकायदेशीर आणि अश्लील कंटेंटवर रोख बसावी यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहोत असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, टिकटॉक ऍप हा सोशल मीडियामधील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय ऍप आहे. या ऍपद्वारे मोबाइलमध्ये 15 ते 20 सेकंदाचे शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर केला जातो. काहीजण केवळ निखळ मनोरंजन व्हावे या उद्देशाने टिकटॉकवर सक्रिय होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)