मुंबई – एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत..’ आणि “बुक्कीत टेंगुळ’ या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक स्टार ‘सुरज चव्हाण’ मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
सूरज चव्हाण हा सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित “का रं देवा..’ या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावणार आहे. सूरज चव्हाण हा तरुण त्याच्या बुक्कीत
टेंगूळ या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्रात रातोरात फेमस झाला होता. टीकटॉक या अॅपमुळे सर्वांसमोर आलेला हा सुरज बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी आहे. मात्र, आता तो त्याच्या चात्यांसमोर थेट हिरो म्हणून येणार आहे.
“का रं देवा..’ या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव करणार आहेत. तर अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहेत.