मुंबई – शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केलेत असं वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्व स्तरातून वाद उभा राहिला होता.
या प्रकरणावरून खुद्द अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी देखील एखाद्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशी वक्तव्ये करणं शोभत नाही, असं म्हणत सुनावलं होतं. दरम्यान, आता एका काँग्रेस आमदाराने आपल्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणौतच्या गालासारखे बनवणार असल्याचं वक्तव्य केलंय.
जामतारा येथे जागतिक दर्जाच्या १४ रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल. हे रस्ते अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त चांगले असतील, याची मी खात्री देतो. असं वादग्रस्त विधान झारखंडचे काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी यांनी केले आहे. सध्या सोशलवर त्यांचा या विधानांचा निषेध युजर्स कडून दर्शविण्यात येत आहे. प्रचार सभेत भाषण करताना केलेल्या विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांचा या विधानावरून राजकारण चांगलं तापल आहे. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.