पॅरिस – आपल्या सूर्यमालेत अनेक प्रकारचे ग्रह आणि तारे आढळतात ब्रह्मांडात आणखी सूर्यमाला असून ब्रह्मांडामध्ये सापडणार्या दुसऱ्या एका सूर्यमालेमध्ये बटाट्याच्या आकाराचा एक अजब ग्रह आढळला आहे. काही वैज्ञानिकांनी या ग्रहाला रग्बीबॉल ची उपमा ही दिली आहे.
कारण या ग्रहाचा आकार रग्बी या खेळातील चेंडू सारखा आहे. हरकुलस नावाच्या तारा मंडळात सापडणार्या या ग्रहाचे नाव डब्ल्यूएएसपी 103 बी असे ठेवण्यात आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने या नवीन ग्रहाची माहिती प्रकाशित केली आहे या ग्रहाचे तापमान सूर्यापेक्षा जास्त असून आकारही आपल्या सूर्यमालिकेतील गुरु ग्रहपेक्षा दुप्पट आहे.
या विचित्र आकाराच्या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालण्यात फक्त 1 दिवस पुरेस आहे अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स नावाच्या एका नियतकालिकांमध्ये संशोधकांनी या ग्रहाबाबत लेख प्रसिद्ध केला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या चेअप्स नावाच्या टेलिस्कोपने या ग्रहाचा शोध लावला आहे. या ग्रहावर विविध प्रकारच्या वायूंचे प्रमाण जास्त आहे.
कारण या ग्रहाचे तापमान ही खूप जास्त आहे. जर्नलमध्ये लेख लिहिणार्या लेखिका सुसान बरोस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा ग्रह आपल्या मुख्य ताऱ्यापासून दूर जात चालला आहे. सर्वसाधारणपणे ग्रह आपल्या मुख्य तार्याच्या जवळ येत असतात पपण बटाट्याचा आकाराचा ग्रह मात्र त्याच्या सूर्यमालेतील मुख्य ताऱ्यापासून दूर जात आहे.