टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. फैजलने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो एका मुलीवर पाणी (अॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो.
BAN TIK TOK .
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 19, 2020
यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे. फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला होता. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींनी ही फैजलवर निशाणा साधला होता. फैजल विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी टिक टॉक अॅप बॅन करण्याची मागणी केली आहे.
परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बॅन ‘टिकटॉक’ असे ट्विट आहे. त्यांच्या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स आणि फॅन्स प्रतिक्रिया देत आहे. परेश रावल यांच्या प्रमाणेच कुशाल टंडननेदखील टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.