चिंबळी -सोळू , चऱ्होली खुर्द, गोलेगाव (ता. खेड) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मरकळ यांच्या वतीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती खेड आरोग्य विभागाच्या वतीने शुगर, डायबेटीस, रक्तदाब, तापमान आदी मोफत तपासणी करण्यात येत आहे.
बाहेरगावी जाणाऱ्या भाडेकरूंना वैद्यकीय प्रमाणपत्र डॉ. भागश्री पाटील यांनी दिले. यावेळी प्राथमिक उपकेंद्राच्या आशा वर्कर, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.