टायगर श्रॉफचा “बागी 3′ या शुक्रवारी रिलीज झाला. टायगर श्रॉफच्या दमदार ऍक्शनचा हा सिनेमा त्याच्या फॅन्ससाठी खास असणार आहे. दरवेळी नवीन सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्टार मंडळी बराच आटापिटा करत असतात. नवनवे फंडे अवलंबत असतात. तसाच प्रकार टायगर श्रॉफने “बागी 3’च्या प्रमोशनसाठी अवलंबला आहे.
“बागी 3′ चे प्रमोशन करण्यासाठी टायगर श्रॉफने या सिनेमाचे पोस्टर स्वतःच लावण्याचा निर्णय घेतला. पोस्टर लावण्यासाठी तो स्वतः चित्रकुट मैदानावर आला होता. त्याला पाहताच त्याच्या फॅन्सची गर्दी जमा झाली. या गर्दीपुढे टायगरने टी शर्ट काढून त्यांच्यासमोर आपल्या पीळदार बॉडीचे प्रदर्शन केले. आपले सिक्स ऍब पब्लिकला दाखवून त्याने सगळ्यांचे कौतुक मिळवले.
अहमद खान यांच्या डायरेक्शन खाली आणि साजिद नाडियादवालाच्या प्रॉडक्शनखाली “बागी 3′ हा “बागी’ सिरीजमधील तिसरा सिनेमा आहे. टायगर श्रॉफबरोबर श्रद्धा कपूर आहे. या सिरीजच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूरच होती. तर “बागी 2’मध्ये दिशा पाटणी होती. “बागी 3′ टायगर आणि श्रद्धा कपूरच्या बरोबर रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, चंकी पांडे ही मंडळी आहेत. त्यांच्या बरोबर जॅकी श्रॉफही पहिल्यांदाच आप्ल्या लेकाबरोबर दिसतो आहे.