Tiger 3 – मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानसह शाहरुख खानच्या कॅमिओची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आता ‘टायगर 3’च्या कमाईची काही आकडेवारी समोर आली आहे. दोन दिवसांच्या कमाईच्या तुलनेत चित्रपटाने आता पर्यंत 59.25 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. हिंदी व्यतिरिक्त ‘टायगर 3’ हा चित्रपट तामिळ आणि तेलुगूमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.
‘टायगर 3’ने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर 3’ हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.