मुंबई – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांनी म्हंटले की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.”