मुंबई – रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांचा घटस्फोट झाला आहे. याबाबत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 32 वर्षांच्या वैवाहिक संसारानंतर गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांचा घटस्फोट झाला आहे.
गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत ‘यंदाची दिवाळी मागील काही वर्षांसारखी नव्हती. आम्ही 32 वर्षे पती-पत्नी म्हणून एकत्र राहिलो, एकत्र आई-वडील झालो आणि नेहमीच एकमेकांची ताकद बनून राहिलो. आम्ही वचनबद्धतेने आणि विश्वासाने आमच्या जीवनात पुढे गेलो आणि याच काळात आमच्या आयुष्यात आमच्या दोन सुंदर मुलींचा जन्म झाला.