Tiger-3 – बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि प्रसिद्ध गायक अरिजित सिंग (arijit singh) यांच्यातील अनेक वर्षांपासून सुरु असलेलं भांडण संपले असल्याचं दिसून येत आहे. सलमानच्या आगामी ‘टायगर-3’ (Tiger-3 ) सिनेमातील पाहिलं गाणं आज प्रदर्शित झालं असून, हे गाणं अरिजित सिंग याने गायलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर या गाण्याची झलक शेअर केली होती. ज्यामध्ये अभिनेत्यानं लिहलं होत की, “पहिल्या गाण्याची पहिली झलक. लेके प्रभू का नाम.! (leke prabhu ka nam) अरे हो, हे माझ्यासाठी अरिजित सिंगचे पहिले गाणे आहे. हे गाणे 23 ऑक्टोबरला येईल.’ असं तो म्हणाला होता.
आणि आज दि. 23 ऑक्टोबरला अखेर “लेके प्रभू का नाम..’ (leke prabhu ka nam) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेता सलमान खान आणि अरजितचे भांडण सर्वज्ञात आहे. त्यामुळे अरजितने जेव्हा हे गाणे गायले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होता.
दरम्यान, या गाण्यातून पुन्हा एकदा कतरिना कैफ आणि सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळाला. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ मध्ये त्यांनी आपल्या केमिस्ट्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
यावेळच्या गाण्यातसुद्धा प्रेक्षकांना ‘माशाअल्लाह’ आणि ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ प्रमाणेच मजा येईल. सध्या सगळीकडे याच गाण्याची जादू पाहायला मिळत असून, हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असल्याचं दिसत आहे.