आळंदी – विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आळंदी रोड वरील साईबाबा मंदिरात आजपासून ( दि. २३) ते गुरुवारपर्यंत ( दि. २६ ) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिरचे विश्वस्त व अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.
साईबाबा मंदिरात उद्या ( मंगळवारी ) विजयादशमीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, आरती व श्रीसाईचरित अखंड पारायण सांगता सोहळा, रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, श्री साईबाबा भजन कार्यक्रम, मध्यान्ह आरती, नामस्मरण , प्रार्थना व दिपज्योत, सीमोल्लंघन व मिरवणूक, पालखी, श्री हरी जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळी 7.30 वाजता निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.
तर बुधवारी ( दि. 25 ) पहाटे 5.45 वाजता श्रींचे मंगलस्नान, श्रींची आरती, मध्यान्ह आरती, धुपारती, शेजारती होणार आहे. गुरुवारी २६ ऑक्टोबरला सांगता समारोप दिवशी पहाटे 5.15 वाजता काकड आरती, मंगल स्नान, आरती, गोपालकाला , मध्यान्ह आरती, धुपारती, पालखी, शेजारती होणार आहे.
गुरुवार पर्यंत मंदिर 24 तास खुले राहणार
विजयादशमी आणि श्री साईबाबा यांची पुण्यतिथी निमित्त मंदिर मंगळवार ( दि. 24) पासून गुरुवार (26 ऑक्टोबर) पर्यंत भाविकांना रात्रभर पारायणसाठी, दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.