लंडन : कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो अशा आशयाची म्हण आहे. पण या हिऱ्याची सुद्धा कदर करावी लागते लंडनमधील एका महिलेला मात्र तिच्या घरात सापडलेल्या एका हिऱ्याचे महत्त्व न कळल्याने तिने हा हिरा कचराकुंडीत फेकून दिला.
छोट्या नाण्याच्या आकाराचा हा हिरा या महिलेला आपल्या एखाद्या ड्रेसचे तुटलेलं बटण वाटलं आणि ते तिने कचराकुंडीत फेकून दिलं. बीबीसी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नंतर या हिऱ्याची किंमत वीस लाख डॉलर्सवर असल्याचे लक्षात आले या प्रकरणातील महिलेचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही आणि या महिलेलाही हा हिरा सदृश प्रकार आपण कधी खरेदी केला होता.
याबाबत काहीही कल्पना नाही तिला याबाबत काहीही आठवत नाही. लंडनमध्ये कुठल्यातरी मार्केट मधून तिने ही वस्तू खरेदी केले असे तिचे म्हणणे आहे. आपल्या घराची साफसफाई सुरू करत असताना तिला हा हिरा दिसला. तिला तो आपल्या ड्रेसचे सुटलेलं बटण वाटलं म्हणून इतर भंगार सामानासोबत तिने कचराकुंडीत फेकून दिलं याबाबतची कल्पना तिने आपल्या शेजाऱ्याला दिली तेव्हा त्या शेजाऱ्याने त्या कचराकुंडीतून तो हिरा उचलून त्याची किंमत करावी असा सल्ला तिला दिला.
हा सल्ला मानून या महिलेने तो हिरा परत कचराकुंडीतून बाहेर काढून वस्तूंचा लिलाव करणाऱ्या मार्क लेन या व्यक्तीकडे ती हा हिरा घेऊन आली आणि त्या हिर्याच्या किमतीची चौकशी करण्यास सांगितले. या महिलेने आपल्या इतर सर्वसाधारण दागिन्यासोबत हा हिरा आणल्यामुळे या वस्तूंची किंमत जास्त असावी.
याची कल्पना त्यालाही नव्हती व कित्येक दिवस या हिऱ्याची किंमत झाली नाही. त्यानंतर हा हिरा बेल्जियममध्ये पाठवण्यात आला. तेव्हा या हिऱ्याची खरी किंमत समोर आली. लंडनमधील केंद्रात 30 नोव्हेंबर रोजी या हिऱ्याचा लिलाव होणार असून या हिऱ्याला वीस लाख ते तीस लाख डॉलर दरम्यान ची किंमत येऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.