जेम्स बॉन्डच्या रोलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेला हॉलीवूड स्टार म्हणजे पईअर्स ब्रॉसनन गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ गायब आहे. आता “फोस्ट चार्ली’मधून तो पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिका साकरताना दिसणार आहे.
व्हिक्टर जिस्चलर यांनी 2001 मध्ये लिहिलेल्या “गन मंकी’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून या सिनेमाचे प्रॉडक्शन सुरू होण्याची अपेक्षा आहे. एका अंडरवर्ल्ड डॉनसाठी ब्रॉसनन कित्येक वर्षांपासून काम करतो आहे.
मात्र प्रतिस्पर्धी गटाचा डॉन जेंव्हा ब्रॉसनन आणि त्याच्या गॅंगला संपवण्याचा घाट घालतो, तेंव्हा ब्रॉसनन कसा प्रत्युत्तर देतो, याची ही कथा आहे. उतारवयातही ब्रॉसनन ऍक्शनमध्ये किती बाप आहे, हे हा सिनेमा बधताना अनुभवायला मिळणार आहे.
पीअर्स ब्रॉसननने आतापर्यंत “डाय अनदर डे’, “वर्ल्ड इज नॉट इनफ’, “गोल्डन आय आणि “टुमारो हॅज नेव्हर एंड’ या चार बॉन्डपटांमध्ये काम केले आहे. त्यातील अखेरचा “टुमारो हॅज
नेव्हर एंड’ खूपच लोकप्रिय झाला होता. त्याची ही इमेज अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. म्हणूनच बॉन्ड पश्चात त्याच्या कारकिर्दीला आव्हानही खूप आहे.