#CWC2019 : भारतीय संघाकडून पुन्हा तीन यष्टीरक्षकांना संधी

मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरूध्दच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यातील विजयी संघात एक बदल केला. कुलदीप यादव ऐवजी संघात युझवेंद्र चहलचा समावेश करत बाकी संघ कायम ठेवला.

तसेच भारतीय संघाकडून या सामन्यात महेंद्रसिंग धोनी या नियमित यष्टीरक्षकाबरोबरच दिनेश कार्तिक व ऋषभ पंत या अन्य दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली. कार्तिक व पंत हे दोघेही आक्रमक खेळाबद्दल ख्यातनाम असल्यामुळेच त्यांचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला.

सलामीवीर लोकेश राहुल हादेखील कर्नाटक संघाकडून यष्टीरक्षक म्हणून काम करतो. भारताने या स्पर्धेत बांगलादेशविरूद्धही धोनी, कार्तिक व पंत या तीन यष्टीरक्षकांना खेळविले होते. त्यावेळी कार्तिकने केवळ 8 धावा केल्या होत्या. पंत याने शैलीदार खेळ केला होता. त्याचे अर्धशतक दोन धावांनी हुकले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.