मनिला (फिलीपाईन्स) – फिलीपाईन्सची राजधानी मनिलातील अँटेनो दे मनिला विद्यापीठात आज झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. या गोळीबारानंतर हल्लेखोराने एक कार चोरली आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले.
Three people killed in Philippine university shooting, reports AFP quoting officials
— ANI (@ANI) July 24, 2022
या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाला देशाचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार होते. मात्र त्यापूर्वीच हा गोळीबार झाल्यामुळे हा समारंभ रद्द करण्यात आला. या गोळीबारामागील हल्लेखोराचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलीस त्याची चौकशी करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.