#कोरोना-कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ट्रस्टच्या तीन जणांनावर गुन्हा

अहमदनगर-अहमदनगर जिह्यातील जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धर्मीक स्थळा मध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता राहत असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुळे खळबळ उडाली आहे.

या मध्ये काहीजण आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया देशांतील तर इतर मंबई व तमिळनाडू राज्यातील आहेत. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. २५ मार्च रोजी सकाळी फिर्यादी पो. कॉ. संदिप मच्छिंद्र आजबे, पो. नि. प्रभाकर पाटील, सा.पो.नि. निलेश कांबळे, पो. हेड काँन्सटेबल बाप्पू गव्हाणे, गणेश साने व बेलेकर हे त्यांच्या शासकीय वाहनाने जामखेड शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शहरातील एका धार्मिक स्थळाचे ट्रस्टी समीर बारूद, याकुब तांबोळी व आजीम सय्यद सर्व रा. जामखेड यांनी वरील आदेशाची माहिती आसतानाही दि. २५ मार्च रोजी या धार्मिक स्थळामध्ये १४ लोक एकत्र जमवून कोरोना या घातक रोगाचा फैलाव होईल हे माहीत असतानाही त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले. यावरून वरील तीन जणांविरोधात १८८ नुसार कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास पो. हे. काँन्सटेबल बाप्पू गव्हाणे हे करीत आहेत.

या सर्व परदेशी नागरिकांना नगर येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे व वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी दिली. जामखेड मध्ये असताना त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र ते परदेशातून आले आसल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस अहमदनगर येथे डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा जामखेड तहसील प्रशासनाने दिला असून फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही असे देखिल स्पष्ट केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.