नवी दिल्ली – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यातील एका महिलेवर एक लाख रुपयांचे इनाम होते, असे त्यांनी सांगितले.
क्षलवादी विचारसरणीबद्दल भ्रमनिरास झाल्याचे कारण देत नक्षलवाद्यांनी शनिवारी संध्याकाळी येथे पोलिस आणि सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या अधिका-यांसमोर शरणांगती पत्करली. दुधी सुकडी (५३), दुधी देवे (३८) आणि मडवी हडमा (२६) अशी आत्मसमर्पण करणाऱ्यांची नावे आहेत.
तुमालपाड क्रांतीकारी महिला आदिवासी संघटनेची (नक्षलवाद्यांची आघाडीची शाखा) प्रमुख म्हणून सक्रिय असलेल्या देवे हिच्या डोक्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
छत्तीसगड सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणानुसार त्यांना सुविधा पुरवल्या जातील. गेल्या वर्षी राज्यातील ३८४ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. सुकमा जिल्हा राज्याच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील सात जिल्ह्यांपैकी एक आहे.