Jaipur Pink Panthers vs Bengaluru Bulls, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 चा 93 वा सामना पाटलीपुत्र इनडोअर स्टेडियम, पाटणा येथे जयपूर पिंक पँथर्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात खेळला गेला. हा रोमांचक सामना 28-28 असा बरोबरीत सुटला.
पैंथर्स और बुल्स के बीच रोमांचक मुकाबला हुआ टाई 🔥#JPPvBLR मैच में किस खिलाड़ी ने जीता आपका दिल❓#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvBLR #JaipurPinkPanthers #BengaluruBulls pic.twitter.com/Dn49vXw5iB
— ProKabaddi (@ProKabaddi) January 28, 2024
जयपूर पिंक पँथर्सने नाणेफेक जिंकून बेंगळुरू बुल्सविरुद्ध कोर्ट मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि बेंगळुरूने प्रथम रेड टाकली. बेंगळुरूला पहिल्या चढाईत(रेड) एकही गुण मिळाला नाही. पहिल्या हाफनंतर बेंगळुरू बुल्सकडे जयपूर पिंक पँथर्सवर 4 गुणांची आघाडी आहे. पहिल्या हाफनंतर सामन्याचा स्कोअर 15-11 असा होता. पहिल्या हाफमध्ये मोनूने बेंगळुरू बुल्ससाठी सर्वाधिक गुण मिळवले.
#PKLSeason10 (#DELvUP Match 92) : दबंग दिल्लीचा यूपी योद्धाजवर दमदार विजय….
मात्र दुसऱ्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्सने चांगले पुनरागमन केले आणि सामना बरोबरीत सुटला. सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांत स्कोअर 25-25 असा होता आणि सामन्याच्या शेवटी 28-28 असा स्कोअर होता. या मोसमातील हा आठवा सामना बरोबरीत सुटला आहे.