नवी दिल्ली – भारतीय हवाई दल(IAF)च्या सामर्थ्यात अजून वाढ होणार आहे. आज संध्याकाळी फ्रान्समधून तीन राफेल लढाऊ विमान भारतात येत आहेत. हे गुजरातमध्ये लँड होतील. फ्रान्समधून निघाल्यानंतर UAE च्या मदतीने यामध्ये एअर-टु-एयर री-फ्यूलिंगही होईल.
भारतात आता राफेलची संख्या वाढून 14 होईल. आतापर्यंत 11 राफेल फ्रन्समधून आले आहेत. न्यूज एजेंसीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अजून 7 राफेल येऊ शकतात. या व्यतिरिक्त राफेलचे ट्रेनर व्हर्जनही भारतात येईल.
तिन्हीही नवीन राफेल अंबाला येथे तैनात होतील. येथे तैनात केल्याने पश्चिम सिमेवर पाकिस्तानविरोधात जलद अॅक्शन घेतली जाऊ शकेल. महत्त्वाचे म्हणजे अंबाला एअरबेस चीनच्या सीमेपासूनही 200 किमीच्या अंतरावर आहे. अंबालामध्ये 17 व्या स्क्वाड्रन गोल्डन एरोज राफेलची पहिली स्क्वाड्रन असेल.
राफेल डीएच (टू-सीटर) आणि राफेल ईएच (सिंगल सीटर), दोन्ही विमान ट्विन इंजिन, डेल्टा-विंग, सेमी स्टील्थ कॅपेबिलिटीजसोबतच चौथ्या जनरेशनचे फायटर आहेत. या जेटमध्ये परमाणून हल्ला करण्याची क्षमता आहे.