पिंपरी, दि. 21 – मुंबई येथे गोवर आजाराचे मोठे रुग्ण आढळत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात देखील या आजाराचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग देखील सज्ज झाला आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात गोवर आजार रोगप्रतिबंधक उपाययोजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी 90 वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, महापालिका रुग्णालय, दवाखान्याचे प्रभारी, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, आयएमए, आयएमए प्रतिनिधी, आयएपी संघटनांचे प्रतिनिधी डॉ. ललित धोका, डॉ. निलम देशपांडे, वायसीएममधील बालरोगतज्ज्ञ डॉ. आंबिके आदी उपस्थित होते.
मुंबई येथे गोवर आजाराचे मोठे रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग देखील सज्ज झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील या आजाराचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र त्यावर काय खबरदारी घ्यावी, या विषयी अनेकांच्या मनात शंका होत्या. त्यासाठी वायसीएम मध्ये कार्यशाळा आयोजित करत जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. चेतन खाडे यांनी उपस्थित 90 वैद्यकीय व्यावसायिकांना रोगप्रतिबंधक उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.