नेपियर – 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा ( NZ vs IND ) सामना उद्या, मंगळवारी नेपियर येथे होणार आहे. या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना खेळण्याची संधी मिळू शकते.
पहिला ( NZ vs IND ) सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 65 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेले नाबाद शतक निर्णायक ठरले होते. परंतु पॉवर प्लेमधील खेळी हा भारतासमोरील चिंतेचा विषय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये इशान किशनसह ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती, पण दोघेही फ्लॉप ठरले.
ऋषभ पंतची आजपर्यंतची खेळी पाहता मालिकेतील शेवटच्या ( NZ vs IND ) सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सॅमसन हा आणखी एक फलंदाज आहे ज्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिलही डावाची सुरुवात करण्याचा दावेदार आहे, पण संघाने डावाची सलामी देण्यासाठी दोन डावखुऱ्या फलंदाजांची निवड केली. टी-20 सामन्यांनंतर खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेतच त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या संघात अधिक फलंदाजांचा समावेश करण्यास उत्सुक आहे जे गोलंदाजी देखील करू शकतात आणि दीपक हुड्डा हा एक पर्याय आहे. मात्र, दुसऱ्या ( NZ vs IND ) टी-20 मध्ये उमरान मलिकचा समावेश न होणे ही सर्वात मोठी निराशा होती. भारताला टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाजाची गरज असल्याचे सिद्ध झाले असून जम्मू-काश्मीरमधील वेगवान गोलंदाज विकसित होण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे.
या वर्षी तीन टी-20 सामने खेळलेल्या उमरानला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अव्वल संघाविरुद्ध खेळण्याच्या दबावाचा सामना करण्याची संधी द्यायला हवी होती. प्रदीर्घ काळानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवलेल्या युझवेंद्र चहलने संघात नियमित का असावे हे दाखवून दिले. मात्र, त्याचा सहकारी फिरकीपटू कुलदीप यादवला केवळ एकदिवसीय सामन्यांमध्येच संधी मिळू शकते.
केन विल्यमसन आउट
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या ( NZ vs IND ) टी-20 सामन्यात खेळणार नाही. वैद्यकीय कारणामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत टीम साऊदी संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात विल्यमसनचीही एक फलंदाज म्हणून उणीव भासणार आहे, कारण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून तो एकमेव यशस्वी फलंदाज होता. त्याने 61 धावांची खेळली होती.