नाशिक- नाशिकमधील एकलहरे येथे सिलेंडरचा स्फोट होवून भीषण दुर्घटना घडली. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मूत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील संभाजीनगर येथे नरसिंग कांबळे (वय 44) हे आपला कुटुंबियांसह राहतात. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात रंगनाथ कांबळे, पत्नी नम्रता (40), निखिल (6), नेहा (4) आणि अर्थव (3) हे पाचही जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान नरसिंग कांबळे, त्यांच्या पत्नी नम्रता आणि मुलगा अर्थवा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. अन्य दोघांची प्रकृतीही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.