पुणे – दिवाळीत लसीकरणाला तीन दिवस सुट्टी असून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र अर्धा दिवस लसीकरण मोहीम चालवली जाणार आहे. दिवाळीनिमित्त महापालिकेला काही दिवस सुट्टी राहणार आहे. त्या दरम्यान महापालिकेने लसीकरण मोहीमही बंद ठेवली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कमी रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळेच लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
मंगळवार आणि बुधवारी संपूर्ण दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. गुरूवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने त्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी अर्धा दिवस लसीकरण सुरू राहणार असून, सकाळच्या सत्रात हे लसीकरण होणार आहे.
त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लसीकरण पूर्णपणे बंद राहणार असल्याचे, महापालिकेतील लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.