वॉशिंगटन : आयुष्यभर पैसा मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करणाऱ्यांना प्रेमापासून वंचित राहावे लागते, असा निष्कर्ष अमेरिकेतील मिशिगन आणि टेक्सास येथील संशोधकांनी काढला आहे. नाते संबंध जोडणे किंवा तुटणे यासाठी पैसा हा महत्त्वाचा असला तरी या संशोधनातून त्याची दुसरी बाजूही समोर आली आहे. पैसे मिळवणे आणि संपत्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणारे आपल्या नात्यांना मजबुती देऊ शकत नाहीत असे या संशोधनात म्हटले आहे.
अशा लोकांचे आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित पटत नाही आणि अखेर त्यांना वेगळे व्हावे लागते असेही निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आले आहेत. या संशोधनात एकूण 434 लोकांचे संशोधन करण्यात आले ज्यांचे लग्न झाले होते किंवा ते विवाह व्यतिरिक्त एकत्र रहात होते.
या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये किती वेळा वादाचे प्रसंग आले याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच त्यांना काही लेखही वाचण्यास देण्यात आले त्यानंतर असे लक्षात आले की संपत्ती वाढविण्याकडे आणि पैसा मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचे आपल्या जोडीदाराबरोबर व्यवस्थित नातेसंबंध नाहीत.
असिस्टंट प्रोफेसर आणि सायकॉलॉजिस्ट देबोरा बोर्ड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या लोकांना वैवाहिक नाते संबंध पेक्षाही आर्थिक यश महत्त्वाचे वाटते त्यांना हे नातेसंबंध टिकवणे अवघड जाते हे लोक प्रेमापासून वंचित राहू शकतात. या सर्व 434 लोकांना एक डायरी लिहिण्यासाठी देण्यात आली होती. सतत सहा आठवडे त्यांना या डायरीमध्ये नोंद करावी लागली जेव्हा जेव्हा जोडीदाराने पैसा मिळवण्याच्या गोष्टी सुरू केला. तेव्हा दुसऱ्या जोडीदाराने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही, असे या डायरीतील नोंदींवरून समोर आले आहे.