‘त्या’ हरामखोरांना लवकर फाशी झाली पाहिजे- निलेश राणे

मुंबई: महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या कोपर्डी प्रकरणाला आज ४  वर्षं होत आहेत. १३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

“कोपर्डी घटनेला आज ४ वर्ष झाली तरी आमच्या बहिणीला अजून न्याय मिळालेला नाही. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो. त्या हरामखोरांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर केली आहे.

 कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेचे ४ वर्षांपूर्वी राज्यभर पडसाद उमटले होते. त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) या तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आज या घटनेला ४ वर्ष पूर्ण झाले तरी देखील मुलीला न्याय मिळाला नाही. याबाबत निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.