Nilesh Rane | निलेश राणेंच्या सभेपूर्वी दगडफेक; पोलिसांना करावा लागला अश्रूधुराचा वापर

Nilesh Rane | माजी खासदार निलेश राणे यांची आज शुक्रवारी (दि. 16) गुहागरच्या तळी येथे सायंकाळी जाहीर सभा होणार होती. या सभेपूर्वी दोन गटात तुफान राडा झाला. आमदार भास्कर जाधव याचे कार्यकर्ते आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांत दडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला.
निलेश राणे सभास्थळी जात होते. यावेळी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आडवे आले. त्यामुळे जाधव आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढला आणि दोन्ही गटाकडून गडफेक करण्यात आली. घोषणाबाजी केली. या राड्यात काही वाहनांच्या काचा फुटल्या. घरांच्या खिडक्याही फुटल्या आहेत. जमाव पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. घटनास्थळी रस्त्यावर दगडांचा खच पडला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी निलेश राणे यांच्या सभास्थळी तळी भागात बंदोबस्त वाढवला आहे. अजूनही या भागात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांचे कार्यालय,निलेश राणेंची सभा होणारे ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. आमदार भास्कर जाधव यांचा या सभेला विरोध होता.





