नवी दिल्ली – यंदाचा आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात 31 मार्चपासून होणार असून, 28 मे दरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने देशांतर्गत होणार आहेत. आयपीएलच्या सामन्यासाठी सर्व संघ सज्ज झाले असून, खेळाडूंचा सराव देखील जोरदार पद्धतीने सुरु असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात होण्यापूर्वीच एका टीमच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. त्यामुळे या टीम मॅनेजमेंटच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. संघातील अनेक खेळाडू दुखपतीच्या कचाट्यात सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका आठवड्यात तब्बल 3 खेळाडू हे दुखापतग्रस्त झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागल्याचं सांगण्यात आलं आहे. आधी कॅप्टन श्रेयस अय्यर याला बॅक इंजरीमुळे तो बाहेर पडलाय. यानंतर न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन यालाही हॅमस्ट्रिंग दुखापत झालीय. तर आता ओपनर बॅट्समन नितीश राणा याला देखील दुखापत झालीय. सरावादरम्यान संघातील तब्बल 3 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे सर्वांचीच डोके दुखी वाढली आहे.
आयपीएलच्या आगामी मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात एकूण 70 लीग सामने खेळले जातील, ज्यामध्ये 18 डबल हेडरचा समावेश आहे. शेवटचा लीग स्टेज सामना 21 मे रोजी आहे. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 2023 बारा शहरांमध्ये आयोजित केले जाईल.