न्यूयॉर्क : अनेकदा आपण इतर जगाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी ऐकतो. काही लोक म्हणतात की आपण ज्या जगामध्ये राहतो त्याशिवाय एक वेगळे जग आहे, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. असे म्हणतात की आपल्या जगात एक अशी जागा आहे जी आपल्याला दुसऱ्या जगात पोहोचवते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की युरोपच्या चेक रिपब्लिकमध्ये असा एक खड्डा आहे, ज्यामध्ये कोणी एकदा पडले तर तो म्हातारा होऊनच बाहेर येतो. चला तर, त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
* हा खड्डा नरकाचा दरवाजा मानला जातो.
हा रहस्यमय खड्डा युरोपच्या झेक प्रजासत्ताकमध्ये स्थित ‘हौस्का’ या किल्ल्यात आहे. वास्तविक 13व्या शतकात हा किल्ला याच खड्ड्यावर बांधला गेला होता. लोक या खड्ड्याला ‘नरकाचे प्रवेशद्वार’ मानतात. या गूढ खड्ड्याची खोली आजतागायत मोजता आलेली नाही.
एका प्रचलित कथेनुसार हा किल्ला बांधण्यापूर्वी सर्व कैद्यांना येथे आणून खड्ड्यात ढकलले जायचे. अशा स्थितीत काही कैद्यांचा मृत्यू झाला, मात्र खड्ड्यातून जिवंत बाहेर आलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. असाच काहीसा प्रकार एका कैद्यासोबत झाला. जर तो खड्ड्यातून जिवंत बाहेर आला तर त्याला सोडण्यात येईल, असे त्या कैद्याला सांगण्यात आले.
असे बोलून त्या कैद्याला खड्ड्यात ढकलण्यात आले. यानंतर त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला, आधी लोकांना तो मेला असे वाटले, पण प्रत्यक्षात तो मेला नव्हता आणि नंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर कैद्याची अवस्था पाहून लोक थक्क झाले. खरे तर तो बराच म्हातारा झाला होता. आजही लोकांना या घटनेमागील कारणाबद्दल काहीच माहिती नाही.
हळूहळू अशा घटना आणि किस्से वाढू लागले, त्यामुळे गावातील लोकांनी मिळून खड्डा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच त्या खड्ड्यावर हौस्का किल्ला बांधण्यात आला, पण हा खड्डा आजही दुसऱ्या जगाचा दरवाजा आहे, असे म्हणतात.