बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
View this post on Instagram
‘फग्ली’ या पहिल्याच चित्रपटाने करिअरच्या सुरुवाती केली पुढे ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी ’ हा सिनेमा मिळाला, त्यानंतर कबीर सिंग या चित्रपटामुळे कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली. तिचा क्युट चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले.
कबीर सिंग या चित्रपटामध्ये तिचे कपडे अतिशय साधेसुधे होते. मात्र, ती खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस असली तरी तीच्या कपड्यांवर फार कमी खर्च करते. यातच आगामी चित्रपटत गुडन्युजच्या प्रमोशन दरम्यान कियारा स्टायलिश अंदाजात दिसली.
View this post on Instagram
ग्रीन रंगाचा शिमरी ड्रेस तिने परिधान केला होता. या ड्रेसला डीप गळा आणि त्यावर चमचमते जॅकेट घातले होते. कियाराच्या जॅकेटची किंमत 14, 164 आहे तर पँटची किंमत 17,750 इतकी आहे. या ड्रेसवर कियाराने कोणतीच एक्सेसरीज घातली नव्हती. दरम्यान, कियाराचे स्टायलिश फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल आहे.