मुंबई – सध्या सोशलवर मराठी वेब सीरिज रानबाजार चांगलीच चर्चेत आली आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सोशलवर रानबाजार वेब सीरिजच्या टिझर नुकताच शेअर केला. या टीझरमधील तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या सुपरबोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधल. तर नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, आनंद जोग, वनिता खरात, मोहन जोशी, अभिजीत पानसे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, सचिन खेडेकर आणि अनेक दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते.
अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांनी केली आहे. ‘रानबाजार’ येत्या 20 मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेब सीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
या ट्रेलरची सुरुवात दोन छोट्या फुलपाखरांनी गरजेपेक्षा जास्त पंख फडफडवले, त्यांच्या कंपन्याने मोठ्ठं वादळ तयार झालं…अशा एका डायलॉगने सुरूवात होते. सुरूवातीला दिसतो तो तेजस्वीचा बोल्ड लुक. पाठोपाठ प्राजक्ता माळीची एन्ट्री होते. एका दिवसात या टीझरला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.