राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपदी अरुण थिगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बॅंकेचे मावळते उपाध्यक्ष सागर पाटोळे यांनी ठरल्यानुसार त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी (दि. 2) बॅंकेच्या सभागृहात उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. निवडणूक अधिकारी तथा खेड दुय्यम निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांच्या अधिपत्याखाली व बॅंकेच्या अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या निवडणुकीत अरुण थिगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे श्रीकांत श्रीखंडे यांनी जाहीर केले. संचालकांच्या एकजुटीतून हा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, किरण मांजरे, विजया शिंदे, राजू सांडभोर, राजेंद्र वाळुंज, डी. के. गोरे, मुकुंद आवटे, हेमलता टाकळकर, राहुल तांबे, धनंजय कहाणे,परेश खांगटे, सतीश नाईकरे, दिनेश ओसवाल, यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुलाणी, बॅंकेचे सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी संजय ससाणे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
अरुण थिगळे म्हणाले की, ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनातून बॅंकेची मोठी प्रगती झाली आहे. बॅंकेच्या प्रगतीसाठी मी ही प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांना चांगल्यात चांगल्या सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करील. मला उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून देवून सर्व संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ करेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी किरण मांजरे, विजया शिंदे, राजू सांडभोर, मुकुंद आवटे आदी संचालकांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदी सर्व संचालकांनी एकमताने दोन थिगळे संचालकांना मोठे मन दाखवून संधी दिली. मनापासून सर्व संचालकांचे आभारी आहोत. सध्या बॅंकांचा संघर्षाचा काळ सुरू आहे. कर्जवसुली व बॅंकेच्या धोरणात्मक निर्णयात मला कोणी नावे ठेवली तरी चालतील पण संस्थेच्या हितासाठी माझ्यात बदल करणार नाही. माझा दृष्टीकोन चांगला आहे. तो संस्थेच्या हितासाठी आहे. माझ्या स्वभावात बदल होणार नाही. संस्थेला प्राधान्य राहील.
– गणेश थिगळे, अध्यक्ष, राजगुरूनगर बॅंक